शर्लिन चोप्राविरोधात शिल्पा आणि राज कुंद्राने ठोकला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी शिल्पा आणि राजने शर्लिन चोप्रा विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार नोंद केली असून शर्लिनने माफी मागून ५० कोटींची भरपाई देण्याची मागणी केली आहे.

शिल्पा आणि राजच्या वकीलाने शर्लिनवर ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. शिल्पा आणि राजच्या वकिलाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, शर्लिन चोप्राद्वारे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर जेवढे आरोप करण्यात आले आहेत, ते सर्व खोटे आहेत. याचा कोणताही पुरावा नाही आहे.

यापूर्वी शर्लिन चोप्राने पोर्न रॅकेटप्रकरणी राज कुंद्रा विरोधात स्टेटमेंट नोंद केले होते. याशिवाय तिने असे म्हटले होते की, राज कुंद्रा आणि त्याचे क्रिएटिव्ह डायरेक्टरने मोबाईल अॅप हॉटशॉट्ससाठी तिच्याकडून शूट करून घेण्याकरिता मागे लागले होते. हे आरोप शर्लिनच्या डिटेल्स स्टेटमेंट जारी केले होते. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचद्वारे दाखल केलेल्या चार्जशीटमधील शर्लिने आरोप केलेला महत्त्वाचा भाग होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा