राज कुंद्रा पोर्नग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया म्हणाली…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राला अश्लिल चित्रपट बनवण्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर राजसोबतच शिल्पा शेट्टीही यामध्ये सहभागी असल्याचं म्हंटल जात असल्यामुळे या दोघांना ट्रोल केलं जातं आहे. यावर आता शिल्पाने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“सध्याची परिस्थितीत अनेकांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहे. मला ट्रोल केलं जातं आहे. मात्र हे ट्रोलिंग केवळ माझ्यापुरतंच नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही यात ट्रोल केलं जात आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयीन असल्याने मी माझी प्रतिक्रिया अजूनही दिलेली नाही. त्यामुळे माझ्या नावाने, माझ्या कोणत्याही खोट्या अफवा, प्रतिक्रिया देऊ नका. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्यमेव जयते म्हणत” असं म्हणत शिल्पाने ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.

“आम्ही कायदेशीररित्या सर्व गोष्टी करत आहोत. परंतु तोपर्यंत माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कन्फर्म नसलेल्या किंवा सत्यता पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टींबाबत अफवा पसरवू नका, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या मुलांचा प्रायव्हसी अधिकाराचा आदर करा,” अशीही विनंती तिने केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा