Shinde-Fadanvis Govt | वर्षावर खलबतं! देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Shinde-Fadanvis Govt | मुंबई : रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) वर्षा (Varsha) वर दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे (Shinde-Fadanvis Govt). या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काल अर्धा तास बैठक झाली आहे. मात्र, ही बैठक का झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये.
सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं समजतय. अशातच आता या नाराजीवर उतारा निघण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल एका अनौपचारिक गप्पांमध्ये विस्ताराचे संकेत दिले.
मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराची प्रतिक्षा हुलकावणी मिळालेल्या आमदारांना लागली आहे. आता फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याचं सांगत ‘डोळे लावून बसलेल्या’ आमदारांना दिलासा दिलाय. या विस्तारात राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातील महिनाभर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मिळून राज्य कारभार सांभळला होता. यावेळी झालेल्या मंत्री मंडळ विस्तारावरुन अनेक आमदार नाराज आहेत. अशातच आता लवकरच दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. दोन महिन्यापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bhaskar Jadhav | “सरकारने दिलेली दिवाळी भेट केवळ गरीब शेतकऱ्यांची केलेली चेष्टा”, भास्कर जाधव संतापले
- Aditya Thackeray | दिवाळीत आदित्य ठाकरे चक्क चिमुरड्यांसोबत किल्ला बांधण्यात रमले
- Lip Care Tips | फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, तर ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो
- Eknath Shinde । “मी कधीच कुणाला घाबरत नाही, नाही तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो नसतो”
- Radhakrishna Vikhe Patil । “उद्धव ठाकरेंचे प्रेम बेगडी”; विखे पाटलांची सडकून टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.