Shinde-Fadnavis | शिंदे-फडणवीस यांचा महाराष्ट्रात एकत्रित दौरा !

Shinde-Fadnavis |  मुंबई :  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौरा केला होता. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील महाराष्ट्र दौरा सोबत करणार आहेत. (Shinde Fadnavis)

शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis)  महाराष्ट्र दौरा 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती स्वत: देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. बुधवारी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

तसेच, राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली होती.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्रित दौऱ्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, आता पार दुष्काळाचे वाटोळे झाले आहे. ओल्या दुष्काळाबाबत मी स्वत: दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकतर सगळ्यांची खरिपाची पिके गेली. रब्बीचीही पिके गेली. शेतकऱ्याला आता काय करावे आणि काय करू नये हे सुचत नाही. तो इतका चिंतेत आहे की विचारता सोय नाही.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.