Shinde Group | ठाकरे गटाला रामराम ठोकत ‘हा’ नेता झाला शिंदे गटात सामील
Shinde Group | मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज एक सूचक ट्विट केलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा आणखीन एक मोहरा कमी होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
Sanjay Agaldareya has entered the Shinde group
नरेश मस्के यांच्या ट्विटनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील एका नेत्यांनं शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश करणारा हा नेता अनिल परब (Anil Parab) यांच्या जवळचा व्यक्ती असल्यास म्हटलं जात आहे. संजय अगलदरे (Sanjay Agaldare) या नेत्यानं शिंदे गटात प्रवेश केला आहे.
संजय अगलदरे (Sanjay Agaldare) हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी 2 वेळा खार दांडा आणि 1 वेळा वरळी या ठिकाणी नगरसेवक पद भूषवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्षप्रवेश (Shinde Group) केला आहे.
पक्षप्रवेश करताना संजय अगलदरे म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार आलं आणि चांगल्या कामांना सुरुवात झाली. या सरकारनं अनेक चांगल्या सेवा दिल्या आहेत. बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं सरकार (Shinde Group) स्थापन झाल्यानंतर अनेक थांबलेली विकास काम पुन्हा नव्यानं सुरू झाली आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !” – चित्रा वाघ
- Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील
- ODI World Cup | वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर
- Ambadas Danve | खत, बियाणे डबलचा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव; अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्त्र
- Sanjay Raut | बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले – संजय राऊत
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XtNxH3
Comments are closed.