Shiny Hair | उन्हाळ्यामध्ये केसांना चमकदार बनवण्यासाठी गुलाब जलचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Shiny Hair| टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणात धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणामुळे केसाशी संबंधित समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब जल (Rose water) चा वापर करू शकतात. गुलाब जलमध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन बी3 आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर गुलाब जल केसांना पोषण प्रदान करते. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने गुलाब जलचा वापर करू शकतात.

गुलाब जल आणि कोरफड (Rose water and aloevera for Shiny Hair)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी गुलाबजल आणि कोरफड उपयुक्त ठरू शकते. या दोन्हीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांना हायड्रेट ठेवतात. यासाठी तुम्हाला 5 चमचे गुलाब जलमध्ये 2 ते 3 चमचे कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दोन तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सल्फेट फ्री शाम्पूने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहू शकतात.

गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and glycerin for Shiny Hair)

उन्हाळ्यामध्ये कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी गुलाबजल आणि ग्लिसरीन उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला गुलाब जल आणि ग्लिसरीन समान प्रमाणात एकत्र करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दोन तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस माइल्ड शाम्पूने धुवावे लागतील.

गुलाब जल आणि मुलतानी माती (Rose water and Multani mati for Shiny Hair)

गुलाब जल आणि मुलतानी मातीचे मिश्रण केसांची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. केसांमधील चिकटपणा दूर करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये अर्धी वाटी गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सध्या पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसातील चिकटपणा दूर होऊ शकतो.

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात फाटलेल्या ओठांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकतात.

मध (Honey-For Dry Lips)

ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकतात. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे ओठांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला ओठांवर दहा ते पंधरा मिनिटे मध लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. नियमित मधाचा वापर केल्याने ओठ मऊ आणि चमकदार होऊ शकतात.

काकडी (Cucumber-For Dry Lips)

उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काकडीमध्ये 90% पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कोरड्या ओठांच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे काकडीचा रस ओठांवर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ सामान्य पाण्याने धुवावे लागतील. दिवसातून एक ते दोन वेळा याचा उपयोग केल्याने ओठ मऊ आणि चमकदार होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या