InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

चाचण्या पूर्ण नसताना ‘शिरापूर’चे जलपूजन ; मंत्री महोदयांच्या गाडीने उडालेला धुरळा जागेवर बसताच प्रशासनाने उपसा केला बंद…

- Advertisement -

अहमदनगर : जलपूजनाचा कार्यक्रम होताच शिरापूर उपसा बंद करण्यात आला आहे. प्रशासन आता याबाबत तांत्रिक कारणे पुढे करत आहे. योजना चाचणी अवस्थेत असताना प्रशासन आणि राजकारण्यांनी जलपूजनाची घाई केली. राजकारण्यांना श्रेय लाटायचे होते तर प्रशासनाला आपण काही तर करतो आहे, असे दाखवायचे होते असे दिसत आहे.

- Advertisement -

Loading...

तालुक्यातील तलाव पाण्याअभावी रिते आहेत. तर इकडे सीना दुथडी वाहत आहे. त्यामुळे उपसा परत चालू करून तलावत पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. गत पंधरवड्यात तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन योजनेची चाचणी चालू केली होती. सीना नदीतून उपसून कालव्यात सोडलेल्या पाण्याने भागातील तलाव भरून घेतले जात होते. तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पाणी साठे रिकामेच आहेत. ह्या रिकाम्या पाणी साठ्याला पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. पाणी चालू होताच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शिरापूरच्या पाण्याचे धूमधड्याक्यात पूजन केले.

त्यावेळीही प्रशासनाकडून नदीत पाणी आहे तोपर्यंत उपसा चालू राहील, अशी माहिती देण्यात आली होती. पणनमंत्री महोदयांच्या गाडीने उडालेला धुरळा जागेवर बसताच प्रशासनाने उपसा बंद केला आहे. त्यामुळे पाण्याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. प्रशासनाकडे या बाबत विचारणा केली असता योजना अजून तांत्रिक विभागाकडेच असून तिचे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे यंत्रणा चालू करण्याची जबाबदारी तांत्रिक विभागाची आहे. या विभागाकडून शिरापूरचे काम एका खासगी कंपनीला दिले असून ह्या कंपनीने पंपगृहातील पंप पाचशे तास चालवून मगच प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.