”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला होता. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी केला होता.

तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं म्हणत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. गीते यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. गीते यांच्या वक्तव्याने आता एका नव्या वादाला जन्म दिला होता. अशातच आता क्रेंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गीतेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनंत गीतेंंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली असून यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचा भाग नसल्याच नारायण राणे यांनी म्हटलं आहे. गीतेंवर कारवाई होणार?, याबाबत बोलताना गीतेंचं आजून काय वाकडं करणार, कदाचित त्यांना फासावर लटकवतील, याशिवाय त्यांना दुसरं काय येतं, असंही राणेंनी म्हणाले. तसेच गीतेंसारखीच शिवसैनिकांची स्थिती आहे, त्यांना कोणी विचारत नसल्याचं म्हणत राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा