‘…शिवसैनिक तुझं थोबाड फोडून तुला गाडतील’: राजन साळवी

मुंबई : आज माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना “वेळ आली तर सेनाभवन फोडू’, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील”, असं म्हणत राजन साळवींनी प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलंय. मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे.

“शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीचं उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करून देईल. तसेच वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे”, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा