शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतील तिकीट वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजय पुराणिक, व्ही. सतीश हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. भाजपच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्यासह शिवसेनेचंही लक्ष लागलं आहे. पितृपक्ष संपल्यानंतर भाजप-शिवसेनेची युती होणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे युतीचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्या राज्यभरात शिवसेना भाजप युतीची घोषणा कधी होणार, याची चर्चा सुरु आहे. मात्र पितृपक्षामुळे युतीच घोषणा रखडली असल्याची चर्चा आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.