InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…म्हणून सुनील तटकरेंना पराभव पत्करावा लागला; धनंजय मुंडेंनी सांगितले कारण

भाजपला, सेनेला मत म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. 2014 मध्ये मोदीलाट होती; परंतु आपल्या गाफीलपणामुळे सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता 2019 मध्ये संधी मिळाली असून, तटकरेंना सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्याची हीच वेळ आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

मी राज्यामध्ये अनेक सभा घेतल्या; परंतु मोदीलाट कुठे दिसली नाही. मागील निवडणुकीमध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत होते; परंतु आता अच्छे दिनाची चेष्टा गावांमध्ये, शहरांमध्ये होऊ लागली आहे.रायगड लोकसभेमध्ये वादळ निर्माण झाले असून, या वादळामध्ये धनुष्यबाणाचे किती तुकडे होतील व कमळाबाईच्या किती पाकळ्या होतील, हे चित्र येथील जनतेला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.

माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे रायगड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ  आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सभेसाठी मुंडे बोलत होते.  नितीन गडकरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, अच्छे दिन बिच्छे दिन कुछ नही होता, उसको महसूस करना होता है, अशा प्रकारे हे जनतेची फसवणूक करीत आहेत असे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply