शिवसेना सर्टिफाईड गुंडाचा पक्ष, राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादांनी करुन दिली ‘ती’ आठवण

मुंबई : राम मंदिराच्या जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपवरून शिवसेनेनं भाजपवर केलेल्या टीकेमुळे काल मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठा माणसांच्या अस्मितेसाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी काहीही बोलतं. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, अशी आठवण करुन देताना कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं, असं सांगत अजितदादांनी एकप्रकारे राऊतांना आरसा दाखवला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा