InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘शिवसेना इथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत नाही’

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना, राज्यात शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे युतीची चर्चा पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. “शिवसेना इथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, “आम्ही स्वबळाची घोषणा केली आहे, शिवसेना प्रस्ताव घ्यायला बसली नाही, असं उत्तर शिवसेने भाजपच्या प्रस्तावाला दिलं आहे. “शिवसेनेशी जवळीक साधावं असं सगळ्यांनाच वाटतंय हल्ली. पण शिवसेना इथे मुंडावळ्या लावून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही. आमचं मॅरेज ब्युरो नाही, प्रपोजल येतायत. शिवसेना, शिवसेना आहे.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.