InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

औरंगाबादेत शिवसेनेतर्फे दहा रुपयात शिवभोजन

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ८) रेल्वेस्टेशन भागात शिवभोजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवभोजन गाड्यावर 10 रुपयांत पोटभर जेवण मिळते. शहरातील हा दुसरा शिवभोजन गाडा आहे. यापूर्वी त्यांनी मोंढा भागात मजूर, कष्टकरी, गरिबांसाठी पहिला गाडा सुरू केला आहे.

श्री. दानवे यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी शहरात 10 रुपयांत पोटभर जेवण देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. अन्नावाचून कुणीही राहू नये, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगत श्री. दानवे यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने अभिनय टॉकीजसमोर शिवभोजन गाड्याचा उपक्रम सुरू केला.

Loading...

या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोंढा जवळच असल्याने येथील मजूर, कष्टकरी, महिला व गोरगरीब, सर्वसामान्य लोकदेखील शिवभोजनचा आस्वाद घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील या संकल्पाचे कौतुक करीत शिवभोजन योजना संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे सांगितले.

एवढेच नाही, तर विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात आणि नुकतेच सत्तारूढ झालेल्या महाआघाडी सरकारच्या संयुक्त जाहीरनाम्यातही या योजनेचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रेल्वेस्टेशन भागात आणखी एक शिवभोजन गाडा सुरू केला आहे.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.