InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने मोर्चाला सुरवात

- Advertisement -

पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने मोर्चा काढला आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. या मोर्चाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला सुरुवात केली. यानंतर विमा कंपन्यांवर हा मोर्चा धडक घेणार आहे.

उद्धव ठाकरे सुरुवातीपासून मोर्चात सहभागी झाली आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मोर्चा संपल्यानंतर उद्धव ठाकरे एक सभाही घेणार आहेत. विमा कंपन्या जाणून-बुजून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. शिवसेना सत्तेत असुनही त्यांच्यावर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.

Loading...

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शिवसेना विमा कंपन्यांना इशारा देणार आहे. जर इशारा देऊनही झालं नाही तर आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. केंद्राकडे स्वतंत्र कृषी स्थापन करण्याची मागणी केल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.