भाजपाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्याने शिवसेना नेत्याचा संताप अनावर

मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक संपताच राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजपा कार्यालयाला आग लावण्यात आली होती. तर सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर आली होती.

मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये कालपासून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर हिंसाचाराविरोधात भाजपाने ५ मे रोजी देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाच्या आंदोलनावरून टोला लगावला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाच्या नियोजित आंदोलनावरून ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. देशाने अजून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव पाहिलेला नाही. त्यामुळे भाजपानुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे, नाही का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.