आमचे आमदार फोडून दाखवावे; गुलाबराव पाटील यांचे भाजपला आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आमदार काही भाजीपाला नाही, हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावे, असे आव्हान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिले आहे.

एकतर्फी सुरु असलेल्या शिवसेनेला भाजपकडून चर्चेची दारे खुली करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.