InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

संजय राऊत यांचा भाजपावर पुन्हा निशाणा

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले शिवसेना खासदार संजय राऊत दररोज ट्विटमधून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आहे. शेर, शायरी यांच्या माध्यमातून राऊत दररोज भाजपाला लक्ष्य करत आहे. आजही त्यांनी एक शायरी ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे.

हवा को गुमान था, अपनी आज़ादी पर. किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. पहिल्या २० मिनिटांतच त्यांचं हे ट्विट दीड हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तर जवळपास ३०० जणांनी ही शायरी रिट्विट केली आहे. काल राऊत यांनी वक्त चित्रपटातील राजकुमार यांचा डायलॉग वापरुन भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. जिनके घर शीशे के होते हैं, वह दुसरों के घर पत्थर नहीं फेका करते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.