‘राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे भाजपचे मनसुबे उघड’

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. अशा वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्यातील चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. 17 नोव्हेंबला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. याच दिवशी मुख्यमंत्री शपथ घेणार अशा चर्चा होत्या. मात्र 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल सांगत आहे. दरम्यान सर्वात मोठा पक्ष भाजपनेही सत्ता स्थापनेच्या दाव्यामध्ये उडी घेतली आहे. राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे भाजपचे मनसुबे उघड झाल्याचे म्हणत शिवसेने भाजपवर विखारी टीका केली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार अशा किंकाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाटत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल का? याची आम्हाला चिंता वाटत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.