शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपाची घणाघाती टीका

मुंबई : अयोध्यामधील राम मंदिरातून शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत असताना बुधवारी मुंबईत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. तसेच, यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असून राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

या सामन्यातून शिवसेना भाजपला प्रत्युत्तर देत असताना, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा टोला लगावला आहे. तसेच अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

राम मंदिराच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी इटालियन कॉंग्रेसकडून रिकव्हरी सैन्याने आदेश घेतले आहेत. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिराच्या इमारतीची बदनामी करण्याचे आणखी प्रयत्न केले जातील. लोक त्यांच्या अंगात अंगणांपासून सावध राहिले पाहिजेत, “असे भातखळकर यांनी ट्विट केले. भातखळकर यांच्याप्रमाणेच इतर भाजप नेत्यांनी देखील शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा