InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेनाचा पाठिंबा’; भुजबळांना विश्वास

पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना त्यांना नक्की पाठिंबा देईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

मराठी माणसाच्या मुद्यावर शिवसेना सकारात्मक आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीलाही शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. त्यामुळे पवारांसाठीही शिवसेना पक्षीय मतभेद बाजुला ठेवेल असं भुजबळांना वाटतं आहे.

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.