“शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”

मुंबई : २०१९ ला शिवसेनेने भाजपसोबत युती तोंडात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राज्यात महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र राज्यातील भाजप नेते राज्यात सत्तांतर होणार असल्याचं वारंवार सांगत असतात. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, 2 महिने टिकेल, 6 महिने टिकेल, दिवाळीपर्यंत टिकेल असं भाजप वारंवार सांगताना दिसत आहे.

मात्र आता भाजपच्या केंद्रीय नेत्यानेच राज्यात सत्तांतर होण्याचं सूचक विधान केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अधिक काळ टिकणार नाही, असं विधान भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी सी. टी. रवी कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नसल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा