जनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरल्यानेच जळफळाट सुरू; नारायण राणेंचा हल्ला

मुंबई: पूरपरिस्थितीवरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने विरोधकांवर हल्ला चढवला होता. त्याला केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेच्या आक्रोशाने शिवसेना हादरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे, असा घणाघाती हल्ला नारायण राणे यांनी चढवला आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. पूरग्रस्त भागात राजकीय पर्यटन नको, असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच त्यांनी आजच्या ‘सामना’मधून नारायण राणेंला लक्ष्य केले आहे. केंद्रीय मंत्री दुर्घटनास्थळी ‘पर्यटन’ करण्याच्यानिमित्ताने महाराष्ट्रात येतात व मुख्यमंत्री, सरकारी यंत्रणांवर लाखोली वाहून निघून जातात.

हे कसले लक्षण समजायचे? नुकसानग्रस्तांना जी मदत हवी, ती केंद्राकडून मिळेल, हे पहायला आलो नाही, सर्वतोपरी मदतही देणार, असे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, असे म्हणत शिवसेनेने राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावरून राणेंनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा