शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेकडून स्वागत, पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच : शिवसेना

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. या बैठकीचं शिवसेनेनं कौतुक केलं आहे. तसंच देशहितासाठी चांगला विरोधी पर्याय आवश्यक आहे. महाविकास आघाडी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली आहे, त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाले तर आनंदच होईल, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. दरम्यान, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर बोलताना अरविंद सावंत यांनी या भेटीचं स्वागतच केलं आहे. देशात एककल्ली कारभार सुरू असून देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत.

बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. राज्यात महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा