InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

 दुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना करणार नाही- आदित्य ठाकरे

दुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना कधीही करणार नाही. दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पीडित शेतक ऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आदित्य ठाकरे हे रविवारी सोलापुरात आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतक ऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.