शशिकांत शिंदेंच्या पराभवावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटीतून आमदार शशीकांत शिंदे यांचा एका मताने नवखा उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. या पराभवाची कारणमिमांसा करताना आमदार शिंदे यांनी निवडणुकीत आपण गाफिल राहिल्याचे कबुल केले. शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे.

निवडणुकीत झालेल्या पराभवावरून शिंदे चांगलेच नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभर टक्के राजकारण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला आहे. आता या सर्व प्रकरणावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“सातारा, जळगाव, सांगली, धुळे, नंदुरबार, लातूर, रत्नागिरी या जिल्हय़ांतील सहकारी बँकांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई, मंत्री के. सी. पाडवी यांना हादरे बसले आहेत. सहकार क्षेत्रात सत्तेमुळे भाजपला जी सूज आली होती ती पुरती उतरली आहे हे कालच्या निकालांनी दाखवून दिले, पण सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे हेवीवेट शशिकांत शिंदे फक्त एका मताने पराभूत झाले.

यानंतर शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली. शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीचेच लोक सक्रिय होते. शिंदे यांचा पराभव का झाला? कोणी केला? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण यानिमित्ताने जी छोटेखानी दंगल झाली ते चित्र बरे नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा