‘शिवसेनेचं सरकार फार काळ टिकणार नाही’

मागील पंधरा दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेवरून शिवसेना भाजपमध्ये भांडण सुरू आहे. विधानसभा कार्यकाळ मुदतही आता काही तासांत संपणार आहे. मात्र तरीही सरळमार्गी सत्तास्थापनेच्या दृष्टीने परिस्थिती अजूनच चिघळत चालली आहे. सत्तेसाठी प्रसंगी शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेनेची सत्तास्थापन करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात, शिवसेनेचं सरकार फार काळ टिकणार नाही.

कर्नाटकातील सरकारचं काय झालं हे सर्वांना माहित आहे. सर्व नाट्य घडले आणि कर्नाटकात पुन्हा भाजपाचंच सरकार आलं. त्या ठिकाणी पुन्हा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालं. तसंच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रातही तेच घडेल असे मा. गो वैद्य यांनी सांगितले.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.