विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा शिवसेनेचा ‘स्टंट’ – अशोक चव्हाण

शिवसेनेच्या पिकविमा मोर्चाबाबत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी खिल्ली उडवली आहे. सरकार म्हणून कर्तव्य बजावण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच आता ते विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा ‘स्टंट’ करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर मोर्चा काढून काहीही होणार नाही. त्याऐवजी शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊन कंपन्यांना भरपाई देण्यासाठी बाध्य केले पाहिजे, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.

शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. बुधवारी 17 जुलैला शिवसेनेना पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार आहे. पिकविमा कंपन्यांविरोधात शिवसेना वांद्रे कुर्ला संकुलात इशारा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.