Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब

Shivendra Raje | सातारा : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कोल्हापूरनंतर आता सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही जहरी टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत यांनी काल साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात माजी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati), खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale), आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Sajay Raut criticized the kings of the Chhatrapati dynasty

“तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील राजांवर केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या याच टीकेचा शिवेंद्रराजे भोसले यांनी तिखट शब्दात समाचार घेतला आहे.

Shivendra raje Bhosale replied to Sanjay Raut

“छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय पवार यांना राज्यसभेचं तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम शिवसेनेने केले. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी टीकाही शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.