शिवेंद्रराजेंनीच मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे, असाही ते म्हणाले.

तसेच मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. शशिकांत शिंदे यांना रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव पत्करावा लागला आहे. शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे.

परिणामी शशिकांत शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत व्यक्तींवर शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनीच माझ्या पराभवासाठी काम केलं, असं शिंदे म्हणाले आहेत. साताऱ्याच्या राजकारणात शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात खुपदा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा