जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हुकल्यावर शिवेंद्रराजेंची पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले,…

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी साताऱ्याच्या राजकारणात आपल्याला पहायला मिळाल्या.तर सर्वात मोठा धक्का म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव. मात्र या सगळ्या घडामोडीनंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर बँकेच्या उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे. पवारांच्या या निर्णयामुळे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. शिवेंद्रराजे यांच्याकडे 3 वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी होती. तसेच गेल्या चारच दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी शरद पवारांची भेट घेत अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र यानंतर आता या सगळ्या घडामोडींवर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, ‘नवीन पदाधिकारी सभापती रामराजे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक अतिशय योग्य पद्धतीने चालवतील. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संधी पुन्हा मिळावी म्हणून मी स्वत: इच्छुक होतो. माझ्याबरोबरच सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्र राजपूरे इच्छुक होते. उपाध्यक्षपदासाठी दत्तानाना ढमाळ आणि शिवरुपराजे खर्डेकर यांनीही इच्छा बोलून दाखवली होती.

प्रत्येकांनी इच्छा व्यक्त केली होती. इच्छुकांनी आपली मते मांडली होती. मात्र, दोन्ही निवडी एकमताने करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, उदयनराजे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर अधिक बोलण्याचे टाळले. निवडीच्या दिवशी उदयनराजे यांनी सकाळी रामराजेंची भेट घेतली होती. मात्र, त्यांच्यात काय बोलणे झाले, याची माहिती मला नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा