Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा! गडावर लाखो मावळ्यांची उपस्थिती
Shivrajyabhishek Sohala | रायगड: आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. किल्ले रायगडावर शिवभक्त हा उत्सव जल्लोषात साजरा करताना दिसत आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी रायगडावर तब्बल अडीच लाखापेक्षा अधिक मावळे एकत्र आले आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
‘Jai Bhawani Jai Shivaji’
‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने किल्ले रायगड दुमदुमला आहे. शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यासाठी किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या खाली शिवभक्त जमले आहे. सुमारे अडीच लाख शिवभक्त रायगडावर शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी आले आहे. तर किल्ल्याच्या खाली 50 ते 75 हजार लोक जमले आहे.
दरम्यान, दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यासाठी अनेकांनी मावळ्यांच्या वेशभूषा परिधान करून चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवले आहेत. त्याचबरोबर या क्षणी शाहिरांनी पोवाडे सादर केले आहे.
06 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक (Shivrajyabhishek Sohala) सोहळा पार पडला होता. यावर्षी 02 जून रोजी तिथीनुसार आणि 06 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Gold Rate | 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिचं मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार
- Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर
- Odisha Train Accident | रेल्वे अपघातात तब्बल 48 तास दिली मृत्यूला झुंज! अखेर मृत्यूच्या दारातून परतला तरुण
- Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43pjkeE
Comments are closed.