Shivsena | “उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शिवसैनिक नसतात”; ठाकरे गटाच्या नेत्याची राणेंवर अप्रत्यक्ष टीका
Shivsena | कोल्हापूर : राज्यात सध्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्रावरुन मोठा राजकीय वाद सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकावरच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रविवारी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही तैलचित्रावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले होते. तर आता कोल्हापूरातील शिवसेनेचे नेते संजय पवार (Sajay Pawar) यांनी शिंदे गटाला थेट आव्हान देत नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव न घेता त्यांनी निष्ठावंताचा अर्थ सांगितला आहे.
“निष्ठावंत आणि ‘मातोश्री’ची नाळ निस्वार्थीपणे जोडलेले शिवसैनिक जयंती साजरी करत आहेत. त्यामुळे विधानभवनात लावण्यात आलेल्या तैलचित्रावरून राजकारण करण्याची गरज नाही. राजकारण करायचे असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बाजूला काढून नरेंद्र मोदींचा लावा” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
संजय पवार यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी नारायण राणे यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. “आरोप करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले आहेत हे आधी पाहावे आणि नंतर टीका करावी. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शिवसैनिक नसतात” अशी खोचक टीकाही त्यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
“शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला आहे. त्यामुळे ज्यांनी दहा पक्ष बदलले आहेत त्यांनी आमच्यावर टीका करू नये” असा टोला त्यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांना लगावला आहे.
“तुमच्याबद्दल काय चीड आहे हे बघायचे असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून दाखवा असे त्यांनी थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले आहे. शिवसेना पक्ष सोडल्यापासून शिंदे गटाचा प्रत्येक आमदार आपण बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असल्याचे सांगत आहे. मात्र ‘मातोश्री’ला धोका देणारे वारस कसे होऊ शकतात”, असा सवाल संजय पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ‘निष्ठावंत शिवसैनिक हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहेत’ असे संजय पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका
- Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी
- Bhagatsigh Koshyari | “मला राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा”; भगत सिंह कोश्यारी देणार राजीनामा
- Nilesh Rane | आदित्य ठाकरेंना आजोबांच्या जयंतीचा विसर; निलेश राणे म्हणाले “गांजाप्रमुख…”
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
Comments are closed.