Shivsena | उद्धव ठाकरेंनी राजीनामा नव्हता द्यायचा?; ठाकरेंच्या याच चुकीबाबत सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
Shivsena | नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिले दोन दिवस ठाकरे गटाची बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्याकडून कशाप्रकारे त्यांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद केला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षावर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर लंच पूर्वी तासभर आधी ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मोठं वक्तव्य केलं आहे.
सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
“तुम्ही राजीनामा दिल्याने अधिकार गमावला आहे. तुमच्या विरोधात 39 आमदारांनी कुठेही मतदान केलं नाही. तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेला नाही. आम्ही काय करावं?”, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचा राजीनामा (Uddhav Thackeray’s resignation)
“उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायला हवं होतं. बहुमत चाचणीला सामोरे जाऊन त्यांनी सर्व गोष्टी रेकॉर्डवर आणायला हव्या होत्या. ते बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले असते किंवा त्यांना इतर पक्षात जावं लागलं असतं. आज शिवसेना पक्ष आणि चिन्हही उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं नसतं, असं राजकीय नेते, राजकीय विश्लेषक आणि कायद्याचे अभ्यासक वारंवार सांगत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मनू सिंघवींना सुनावलं
“जर तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता, ज्यात खुल्या पद्धतीने मतदान होतं, आणि हरला असता तर त्या 39 आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला ते स्पष्ट होऊ शकलं असतं. जर फक्त त्या 39 आमदारांमुळे तुम्ही विश्वासदर्शक ठराव हरला असता, तर ते अपात्र ठरल्यानंतर तुम्ही तो ठराव जिंकला असता”, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.
आज सर्वोच्च न्यायालयातही नेमका याच मुद्द्यावर सरन्यायाधीस डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्याला कलाटणी मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.
ठाकरेंच्या राजीनाम्यावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर हे 39 जण कुठल्या दिशेने मतदान करतात हे दिसलं असतं असा सरन्यायाधीशांचा मुद्दा होता. त्यावर आमच्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा दिला न दिला हा भाग वेगळा. कारण ते अविश्वास ठरावासाठी गेले असते, तर या 39 जणांचं मतदान ज्या व्हीपमुळे सिद्ध होणार होतं तोच व्हीप 3 तारखेलाही लागू होता”, असे अनिल देसाई म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”
- Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी
- Sanjay Raut | “फडणवीस 40 खोक्यांखाली चिरडून काम करतायेत”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Gulabrao Patil | “एकच पिक्चर बघून लोक बोअर झालीत, दुसरं काहीतरी वेगळं करा” गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
Comments are closed.