Shivsena | उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या नावावर ‘या’ ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया! म्हणाले, “नाव जरी…”
मुंबई : अंधेरी (पूर्व) पोटनिवडणक नोहेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि नावं देण्यात आली आहेत. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलं असून,’मशाल’ हे चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे गटाला शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं असून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ठाकरे गटाला मिळालेल्या नावावरून बाळासाहेब ठाकरे यांचे नातू जयदीप ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले जयदीप ठाकरे ?
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जरी त्यांच्याकडे असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे, असं म्हणत जयदीप ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयदीप ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं, हे खूप वाईट झालं. कारण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मराठी माणसाच्या हक्कासांठी लढणारं चिन्ह आणि नाव आहे. हा पक्ष वाढवण्यासाठी जी काही मेहनत, संघर्ष केलाय, लोकांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांना मोठं केलं, त्यामुळे लोकांनी ते विसरू नये. मशाल हे क्रांतीचं प्रतिक आहे आणि शिवसेना क्रांती घडवणारच, असा विश्वास जयदीप ठाकरे यांनी त्यावेळी व्यक्त केला. तसेच जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं असून, लवकरच जयदीप ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 5 ओक्टोबर रोजी शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले. त्यावेळी जयदेव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या व्यासपिठावर दिसून आले. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी जयदेव ठाकरे यांचे सुपूत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं असल्याचं दिसून आलं. या चित्रानंतर अनेक चर्चांना उधान आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अडचणीत! धगधगत्या मशालीवर ‘या’ पक्षाचा दावा, निवडणूक आयोगाकडे घेतली धाव
- Ambadas Danve | “गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरी…”; अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्ला
- Eknath Shinde | “आम्हाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाले, कारण…”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
- Eknath Shinde | “सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार”
- Eknath Shinde। “आता तरी मान्य करा, खरी शिवसेना…”; एकनाथ शिंदे यांचा खोचक टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.