Shivsena | औरंगाबादच्या रस्त्यावरुन एकनाथ शिंदे जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद येथील पैठण मध्ये जाहीर सभा घेत आहेत. मात्र सभेपूर्वी शिंदे ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यां कडून गोमूत्र शिंपडण्यात आलं. यामुळे संबंधित ठिकाणी चांगलाच राडा झाला आहे.

एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरुन गेले तिथं शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडलंः

एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरून गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं. यावरून शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून दोन्हीकडून एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदेंच्या सभेपुर्वी अनेक हालचाली होत आहेत. काही वेळापुर्वीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून धुमाकूळ माजला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षात सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना मोठा झटका देत भाजप सोबत युती केली. यामुळे शिवसेना पक्षात त्यांच्या बाबत मोठ्या प्रमाणात द्वेष आहे.

दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ज्या ठिकाणी औरंगाबाद मध्ये सभा घेतली होती तिथे हा प्रकार घडला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गोमूत्र शिंपडणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.