Shivsena | क्षीरसागरांना शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणं भोवलं, शिवसेना पक्षाने थेट केली हकालपट्टी

Shivsena | बीड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) पक्षातील नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जवळीक करणं चांगलंच आंगलट आलं आहे. क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तशी घोषणा देखील बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे. यानंतर बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी, बीड नगरपालिकेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या 70 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. हा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धततीने झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस,युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर, राज्याचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले आहेत.

जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही –

जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नसून मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नसल्याचं पाटील म्हणाले. नुकत्याच केलेल्या उद्घाटनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला नाही, ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसेल, अशी घोषणा जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली.

दरम्यान, सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. अनेकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती देखील धोंडीराम पाटलांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.