Shivsena | ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीविषयी कोर्टात याचिका; आदित्य ठाकरे म्हणाले…
Shivsena | मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणायात आलीये. या याचिकेत ठाकरेंकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आलाय.
या प्रकरणावर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. दसरा मेळाव्यात जे शिवसैनिक (shivsainik) आले होते ती आमची संपत्ती आहे, असं सांगतानाच कोर्टावर जास्त काही बोलणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी पार पडली आहे.
गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांची याचिका
गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी या याचिकेत उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आलीय. यावर याचिकाकर्त्यांना काही दुरुस्तीसह पुन्हा याचिका दाखल करण्याचे निर्देश न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने दिले आहेत. ठाकरेंचं उत्पन्न आणि त्यांची संपत्ती याचा ताळमेळ लागत नसल्यानं याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे मुख्यमंत्रीपदावरून पाय उत्तर झाल्यानंतर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे तसेच शिवसेना पक्ष कुणाचा यासंदर्भात देखील अद्यापही केंद्रीय निवडणूक आयोग मध्ये लढाई सुरू आहे त्यातच पक्षातील कार्यकर्त्यांना नवीन भरारी देणे आणि त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करणे यात सध्या उद्धव ठाकरे सक्रिय असले तरी मात्र त्यांच्या मागे अडचणी कमी होताना दिसत नाही आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
- Rupali Thombare । “राणेंनी स्वत:सहीत पोरांना आवरतं घ्यावं”; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या
- CM Eknath Shinde | शिंदे साहेब! दिवाळी गोड करण्यासाठी सर्व शेतकरी पुत्रांनी तुम्हाला पत्र लिहावं का?
- Rupali Thombre | पुण्यातील पावसावरून रुपाली ठोंबरे यांचे अमृता फडणवीसांवर टीकास्र, म्हणाल्या…
- Bhaskar jadhav | घरावर झालेल्या हल्ल्यानंतर भास्कर जाधवांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.