Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा
Krupal Tumane | मुंबई : नुकताच शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde Team) 13 खासदार निवडून येणार असं देखील म्हटल तर ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray Team) खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
ठाकरे गटातील खासदार फुटणार : कृपाल तुमाने
मीडियाशी बोलताना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने ( Krupal Tumane) यांने खळबळजनक गौप्यस्फोट करत म्हटल आहे की, आमच्या गटाचे सर्व 13 खासदार निवडुन येणार आहेत. तसचं ठाकरे गटाचे राहिलेले खासदारही शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. याचप्रमाणे या खासदारांसोबत आमची बैठक देखील झाली असल्याचा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde Team On Uddhav Thackeray Team
दरम्यान, कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी संजय राऊतांनी ( Sanjay Raut) केलेला दावा फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांनी दावा केला होता की, शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत. यामुळे तुमाने यांनी संजय राऊतांवर देखील सडकून टीका करत म्हटल की, राऊत पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला तरी देखील उद्धवजी त्यांना काही बोलत नाहीत. या कृपाल तुमाने यांच्या दाव्यानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. ही शिंदे गटाची राजकीय खेळी असू शकते? शिंदे गट आणि ठाकरे गटातील खासदारांमध्ये खरच बैठक झाली का? त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार का? असे प्रश्न तुमाने (Krupal Tumane) यांच्या या विधानाने पडत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- HSC Result | 12 वी निकालामध्ये मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक निकाल
- Gautami Patil | “गौतमी ‘पाटील’ नावाची बदनामी करतीये, आडनाव बदलावं अन्यथा…”; गौतमीला इशारा
- Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत
- Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…
- Medicine Purchase | सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा! ग्राहकांना औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची नसणार सक्ती
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MTviX1
Comments are closed.