Shivsena | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आंबादास दानवे यांच्यावर पलटवार केला आहे. नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे आणि राजन विचारे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
“ज्या संभाजीनगरमधून विधान परिषदेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडून आले आहेत. त्यांना तिकडे कोण विचारतं, आणि त्यांची नगरसेवक तरी होण्याची त्यांची पात्रता नाही”, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी दानवेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
“हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला” (Naresh Mhaske Criticize Uddhav Thackeray)
“ठाकरे गटाला आता शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट असं म्हणायला यांना लाज वाटते. त्यामुळे ही लोकं बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय म्हणायला लागले. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याच्याबद्दल यांनी प्रथम बोलावं. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत म्हणून काय झालं. मलंगड यात्रेत ते येऊ शकले असते. मात्र त्यांना घरात बसून हिंदुत्व टिकवायचं आहे. फक्त मतांकरता हिंदुत्वाची भाषा करायची आहे”, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
“आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडलेले” (Naresh Mhaske Criticize Jitendra Awhad)
“जितेंद्र आव्हाड प्रभू रामचंद्र आणि रावण, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिस्तेखान आणि औरंगजेब यांची तुलना करतात, त्या माणसांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात त्यामुळे त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी खोचक टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
“त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही”
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बॅनर लावलेले आहेत, त्यावर आमचे फोटो टाकलेले आहेत. यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया घ्यावी, त्यांचे नगरसेवक जर आम्हाला भेटत असतील त्यांना सोडून जात असेल तर त्याचा जाब त्यांना विचारावा. जितेंद्र आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
“आम्हाला हिंदुत्व शिकवू नका”
विरोधी पक्ष नेते श्रीमलंगगड यात्रेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यामुळे हे हिंदुत्व आमचं आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते राजेंद्र विचारे यांनी दिल्यानंतर नरेश मस्के यांना विचारला असता, “तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आली की त्यावेळेसच फक्त तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता त्यामुळे त्यांनी हा विचार करू नका”. असेही नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
“धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारसा पुढे घेऊन जात आहेत. विरोधकांकडे काही गोष्टी उरल्या नाहीत त्यामुळे आता टीका करतात. म्हणून आम्ही त्याकडे लक्ष देत नाही” असे म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- INC | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका
- CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी केली जाहीरातीसाठी शासनाच्या तिजोरीतून कोटींची उधळपट्टी; माहिती अधिकारातून उघड
- Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
- Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला
- Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट