Shivsena | “प्रकाश आंबेडकरांनी राऊतांची लायकी काढली”; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका
Shivsena | मुंबई : राज्यात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केले. या युतीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची आणि वंचितची युती झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मोठं वाक् युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावरुन शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका राऊतांवर जहरी केली आहे.
“संजय शिरसाठ यांनी ‘महाविकास आघाडीत कधीही बिघाडी होऊ शकते’ असंही म्हंटले आहे. आमदार संजय शिरसाठ यांनी सीव्होटरचा नुकताच आलेल्या सर्व्हेवर भाष्य करत असतांना शरद पवार यांचे उदाहरण देऊन सर्व्हेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. याशिवाय संजय राऊत दररोज कोणत्याही विषयावर बोलत असतात. ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नसतो त्याच्यावरही बोलत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत म्हणून जागा दाखवून दिली आहे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांनी लायकीच काढली आहे” अशी जहरी टीका संजय शिरसाठ यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ‘कोण संजय राऊत’ असा सवाल केला होता त्याचा संदर्भ देत संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका केली आहे. “सर्व्हेवर अंदाज बांधायचा नसतो, शरद पवार यांची एक सभा आठवतेय का? पावसामध्ये झालेली सभा सगळे सर्व्हे गुंडाळून टाकले होते, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी उमेदवार सुद्धा म्हणायला लागले होते की, पावसाला पण आत्ताच यायचे होते का? त्यामुळे अशा सर्व्हेवर काहीही नसतं, संजय राऊत यांच्या समाधानासाठी चांगले आहे. संजय राऊत यांना अत्यंत आनंद झाला आहे”, असे संजय शिकसाट म्हणाले आहेत.
“संजय राऊत जास्त फिरत नाही, भांडुप व्हाया मातोश्री आणि प्रभादेवी यांच्यावर असलेला माणूस सर्व्हेवर बोलायला लागला आहे. आजकाल ज्याला कसली माहिती नाही तो कशावरही बोलतो. म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी जी जागा दाखवली ना ती याच कारणामुळे जागा दाखवली आहे. आता तरी सुधारले पाहिजे. कोण संजय राऊत मी याला ओळखत नाही असे म्हणून प्रकाश आंबेडकरांनी त्यांची लायकी दाखवली आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | “शाहरुख खान भारताचा…”; ‘पठान’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- BJP | “यात उद्धव ठाकरेंची ‘न घरका ना घाटका’ अशी परिस्थिती”; भाजप नेत्याचा टोला
- Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
- Sharad Pawar | “आगामी निवडणुका…”; वंचितसोबतच्या युतीबाबत शरद पवारांची भूमिका स्पष्ट
- Sharad Pawar | “बरं झालं महाराष्ट्राची सुटका होणार”; राज्यापालांच्या राजीनाम्यावरुन शरद पवारांची बोचरी टीका
Comments are closed.