Shivsena | “बाळासाहेबांनी शिवसेना स्थापना केली, तेव्हा हे पाळण्यात लोळत होते”; ठाकरे गटाची शिंदेंवर जहरी टीका

Shivsena | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) अलीकडे चर्चेत आले आहेत. शिवसेनेत बंडखोरीवरून बंडू जाधवांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. “अडीच वर्षात कार्यकाळात आम्हाला सत्तेचा लाभ झाला नाही. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे स्वत: लक्ष दिलं नाही. अन्य कोणाला अधिकारही दिले नाहीत. त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढावला”, असे वक्तव्य बंडू जाधवांनी केलं होते. त्यानंतर आता बंडू जाधवांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

बंडू जाधवांची एकनाथ शिंदेंवर टीका

“शिवसेना ही ठाकरे यांच्याशिवाय होऊ शकत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा आजचे मुख्यमंत्री पाळण्यात लोळत होते. त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगावा हे आम्हाला आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसाला पटलं नाही. शिवसेना ठाकरेंचीच होती आहे आणि राहणार, यात दुमत नाही,” असं बंडू जाधवांनी सांगितलं आहे.

MP Sanjay Jadhav criticize CM Eknath Shinde

“एका सामान्य परिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे आमदार, मार्केट कमिटी, खासदार या सर्व पदांवर काम करण्याचं भाग्य मिळालं. हा जन्म काय, सात जन्म पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, एवढं दिलं आहे. त्यामुळे पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर खूप ठेंगणं वाटतात”, असे बंडू जाधव म्हणाले आहेत.

“तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची आटवल्याने ह्यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं. आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली,” असे बंडू जाधव म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.