Shivsena | मोठी बातमी: उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा पाठिंबा

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चांगलांच कलगितुरा रंगला आहे. सोमवारी या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आजपासून शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. त्यातच आता भाजपच्या बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे. शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला चक्क भारतीय जनता पक्षातून पाठिंबा मिळाला आहे. भाजपच्या मोठ्या नेत्याने ठाकरे यांच्या मागणीचे समर्थन करत ट्विट केले आहे. त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या बड्या नेत्याचा पाठिंबा

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलेय. “निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण आयोगाचे कामकाज संशयास्पद आहे”, असे सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-