Shivsena | वरळीतून लढवून दाखवण्याचं ठाकरे गटाचं चॅलेंज शिंदे गटाने स्विकारलं; ‘या’ रणरागिणीने उचलला विडा
Shivsena | मुंबई : युवासेने प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांचे हे आव्हान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी स्वीकारले आहे.
‘पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांना तुमच्या विरोधात लढण्याची गरज नाही’, असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंच्या पैंजेचा विडा उचलला आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
“आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकलं. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोकं ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत”, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
“आदित्यजी, तुम्हाला एक प्रश्न विचारते. वरळीतून आपल्याला 6 हजाराच्यावर नोटाची मते मिळाली आहेत. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचं साधं जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचं असेल तर तुम्हाला भेटता येत नाही अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. तीन तीन आमदार द्यावे लागले तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात. पण तुम्हाला त्या वरळीत दोन अधिक आमदार द्यावे लागले. एका वरळीत तीन तीन आमदार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला माजी नगरसेवक संतोष खरात सारखी व्यक्ती ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले”, असेही शीतल म्हत्रे यांनी सांगितले आहे.
वरळीमधून निवडणूकीत हरण्याची तुमची खुमखुमी आमच्यासारखे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिकच पूर्ण करतील… pic.twitter.com/TJ2bN6YE6J
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) February 4, 2023
आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज
“मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे
- Jitendra Awhad | गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा आव्हाडांनी घेतला समाचार
- Sanjay Raut | “पंतप्रधान मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात?”; राऊतांचा निशाणा कुणावर?
- Gopichand Padalkar | अजित पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…
- Car Safety Features | उत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससह बाजारामध्ये उपलब्ध आहेत ‘या’ कार
Comments are closed.