Shivsena | शिंदे अडचणीत येणार? कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंची ‘ती’ चूक न्यायालयासमोर आणली

Shivsena | नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तीवादास सुरवातही केली आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी कालचा युक्तिवाद आज पुन्हा सुरू ठेवला. ठाकरे गटाकडून सुरु असलेल्या युक्तीवादामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांची एक चूक महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं नाही. ही चूक शिंदे यांना भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना व्हीप बजावला होता. बैठकीला बोलावलं होतं.

“त्या बैठकीला शिंदेही नाही आणि त्यांचे आमगारही”

अधिकृत मेलवरून 22 जून रोजी तसा व्हीप बजावला होता. पण एकनाथ शिंदे बैठकीला आले नाही. बैठकीला का आले नाही? याचं उत्तरही शिंदे यांनी दिलं नाही. त्यांचे आमदारही आले नाही. शिंदेंना हा व्हीप लागू होता. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी आज न्यायालयामध्ये केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गटनेते आणि प्रतोद कसे निवडतात?

विधीमंडळ गटनेतेपद, मुख्यप्रतोद आणि शिवसेना नेतेपदाची निवड यावर कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना अधिक भर दिला असल्याचं दिसतंय. यावेळी कपिल सिब्बल यांनी गटनेते आणि प्रतोद कसे निवडतात? याचं वाचन केलं. त्यावर न्यायालयानेही काही टिप्पणी केली आहे.

कपिल सिब्बल आणखी काय म्हणाले?

2019मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विधानसभेच्या उपाध्यक्षांना तसं कळवलं होतं. याचा अर्थ त्यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती केली का? त्यावर काही निवडून आले, काहींची नियुक्ती केली होती, असे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या