Shivsena | “हा न्यायदेवतेचा अपमान”; शिवसेनेनं ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले. आमदारांना बजावलेल्या व्हीपचा मुद्दा समोर आला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये’, असे निर्देश दिले होते. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सर्व 55 आमदारांना व्हीप बजावला आहे. यावर ठाकरे गटाचे प्रदोत सुनील प्रभू (Sunil Prabhu)  यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुनील प्रभूंचं प्रत्युत्तर (Sunil Prabhu’s Replied Bharat Gogawale)

“आमच्या उपस्थितीसंदर्भात जो व्हीप बजावयाचा, तो आम्ही बजावणार आहे. ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत. शिंदे गटाच्या वकीलांनी न्यायालयात सांगितलं की, ‘कोणताही व्हीप बजावणार नाही’. मग, न्यायालयाला सांगूनही व्हीप बजावत असतील, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. न्यायालयाचा अवमान त्यांनी केला आहे, असं सांगू. न्यायदेवता आम्हाला न्याय देईन,” असं सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

काय म्हणाले भरत गोगावले?

“शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशन काळात हजर राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. सर्व 55 आमदारांना हा व्हीप बजावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये, असं निर्देश दिले आहेत. पण, अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही. हा व्हीप आहे की सर्वांनी सभागृहात हजर राहावं.”, असे भरत गोगावले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-