InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा निघाला मोबाइल चोर, स्थानिकांनी दिला चोप

- Advertisement -

अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायकला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. विनायकला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. त्यासाठी तो चोऱ्या करुन गांजा आणि ड्रग्ज घेतो अशी माहिती समोर आली आहे. विनायकने ५० पेक्षा जास्त मोबाइल आणि सोनसाखळ्या चोरल्याचे गुन्हे कबूल केले आहे. व्यसनासाठी तो चोरलेले मोबाइल आणि सोनसाखळ्या विकतो अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.

विनायकला एकाचा मोबाइल चोरताना स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. विनायकला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.