‘सामना’तून केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘’च्या अग्रलेखामधून आपचे सर्वेसर्वा आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

‘नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. आम्ही या प्रकाराशी सहमत नाही. केजरीवाल यांच्या सुरक्षेत कोणतीही फट राहता कामा नये. एखाद्या माणसाने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?,’ असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.