InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी ‘यांना’ मिळू शकते संधी

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले. भाजपचा 23 जागांवर तर शिवसेनेचा 18 जागांवर विजय झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 30 मेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर एनडीएच्या मंत्र्यांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे या बैठकीदरम्यान पाच मंत्रीपदं मागणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी राज्यसभा खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, रत्नागिरी सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत आणि दक्षिण मध्य मुंबईतील खासदार राहुल शेवाळें यांची नावं चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.