InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव?; उद्धव ठाकरे म्हणाले…

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात ईडीचा मुद्दा सर्वाधिक गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. या प्रकरणात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्याचा राष्ट्रवादीला फायदाच झाल्याचं बोललं गेलं. पण त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत आता शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

‘तुमच्यावर सुद्धा ईडाचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल?’, असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काय ते ईडी? मला नका सांगू त्या गोष्टी. कर नाही त्याला डर कशाला? मी लढणाऱ्या पित्याचा लढणार पुत्र आहे. माझे आजोबासुद्धा योद्धा होते. मी घाबरत नाही. उगाच भलतेसलते प्रयोग करू नका.’ ईडीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक उत्तर देत इशाराही दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.